निवडणुकीचे धूमशान / भारतवंशीय मतदारांना जवळ करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आजपासून प्रचारशैली बदलणार

न्यूयाॅर्क : येत्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक होत असून, त्यात भारतीय मतदारांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी ट्रम्प यांनी आपली पूर्ण ताकद लावायचे ठरवले आहे. भारत दौऱ्यावरून परतल्यानंतर खुशीत असलेल्या ट्रम्प यांनी भारतीय मतदारांना खुश करण्यासाठी तीन प्रकारच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून प्रचाराचा धडाका लावायचे ठरवले आहे. बुधवारी या जाहिराती सोशल मीडियात प्रसिद्ध होतील. भारतीय मतदारांना प्रभावित करण्यासाठी एखादा अमेरिकेचा अध्यक्ष प्रथमच असे प्रयत्न करताना दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय वंशाच्या १४ लाख मतदारांची मते येथे निर्णायक ठरणार आहेत. पण २०१६ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यातील ८४ टक्के भारतीयांनी ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले होते. या पार्श्वभूमीवर ट्रम्प हे प्रयत्न करत आहेत, हे महत्त्वाचे.


२०१६ च्या निवडणुकीत ८४ टक्के मतदान विरोधात


यंदाच्या निवडणुकीत १४ लाख भारतीय मतदारांची नोंद झाली आहे. आशियन अमेरिकन आणि पॅसिफिक आयलँडर्सनुसार २०१६ मध्ये ही संख्या १२ लाख मतदार होते. त्यापैकी ८४ टक्के भारतीयांनी ट्रम्प यांच्याविरोधात मतदान केले होते.


ट्रम्प यांची धोरणे अनिवासी भारतीयांच्या विरोधात


१९९० च्या दशकात डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्ससाठी अनिवासी भारतीय मतांचे प्रमाण अनुक्रमे ६०-४० असे होते. पण ९-११ च्या घटनेनंतर अनिवासी भारतीयांच्या विरोधात हल्ल्याचे प्रमाण वाढले. अनिवासी भारतीयांचा द्वेष करणाऱ्यांशी रिपब्लिकनने संधान बांधले. त्यामुळे त्या भारतीयांचा रिपब्लिकन्सकडे ओढा कमी होत गेला. २०१६ च्या निवडणुकीत तर २० टक्क्यांपेक्षा कमी भारतीयांनी रिपब्लिकन उमेदवारांना मते दिली. याचा परिणाम म्हणून अनिवासी भारतीयांविरोधात आमची धोरणे राहतील, असे ट्रम्प जोरात सांगत होते. आता देखील ट्रम्प यांना संपूर्ण समर्थन मिळेल, याची खात्री वाटत नाही. कारण उच्चशिक्षित भारतीयांसाठी इमिग्रेशनचे नियम कडक केले आहेत. एच १ बी व्हिसाची संख्या कमी केल्यामुळे अनिवासी भारतीय ट्रम्प प्रशासनावर टीका करत आहेत. तसेच एच १ बी व्हिसा दिलेल्या जोडीदाराचे वर्क परमिट रद्द करण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. पण काही भारतीय मतदार ट्रम्प आणि मोदी यांचे संबंध कसे आहेत, याचाही विचार करून मतदान करतील.


२०१६ च्या निवडणुकीत ८४ टक्के मतदान विरोधात : यंदाच्या निवडणुकीत १४ लाख भारतीय मतदारांची नोंद झाली आहे. आशियन अमेरिकन आणि पॅसिफिक आयलँडर्सनुसार २०१६ मध्ये ही संख्या १२ लाख मतदार होते. त्यापैकी ८४ टक्के भारतीयांनी ट्रम्प यांच्याविरोधात मतदान केले होते. ६२ टक्के भारतवंशीय स्वत:ला डेमोक्रॅटिक म्हणवतात. सध्या अमेरिकेत पाच भारतीय खासदार आहेत. हे सर्व डेमोक्रॅटिक आहेत. यात रो खन्ना, कॅलिफोर्निया, प्रमिला जयपाल, वॉशिंग्टन, राजा कृष्णमूर्ती- इलिनोडस, तुलसी गेबार्ड- हवाई, कमला हॅरिस- कॅलिफोर्निया यांचा समावेश आहे.


भारतीयांसाठीची प्रचारपद्धत


पहिल्या जाहिरातीत आपली पत्नी मेलानियासमवेत ट्रम्प ताजमहालासमेार उभे आहेत. यात ते म्हणतात की, भारतीय लोक उद्योग व्यवसायात मशहूर आहेत आणि टेक्नॉलॉजीत मास्टर आहेत. मी तुमच्यासाठी नेहमीच संघर्ष करत राहीन. दुसऱ्या जाहिरातीत ट्रम्प आणि मोदी एकत्र आहेत. यात ते म्हणतात की, अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे. अमेरिका भारतासोबत मजबूत भागीदारी करू इच्छितो.


इवांकांची ट्िवटर डिप्लोमसी


इवांका म्हणतात की, मला ताजमहाल दाखवल्याबद्दल धन्यवाद. हा अनुभव मी कधीही विसरणार नाही. दुसऱ्या ठिकाणी त्या म्हणतात की, भारतीयांनी आमचे ज्या उत्साहाने स्वागत केले, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. मी अनेक नवे मित्र बनवले.


२२ भारतवंशीयांना प्रशासनात स्थान


खरे तर अध्यक्ष झाल्यापासूनच ट्रम्प हे भारतवंशीय मतदारांना आपल्याबाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत व्हाइट हाऊस प्रशासनात २२ भारतवंशीयांना सामील केले आहे. अन्य कोणत्याही देशापेक्षा भारतवंशीयांची संख्या जास्त आहे. यात निक्की हेली यांना संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेचे राजदूत बनवले तर सीमा वर्मा यांना मेडिकेअर आणि मेडिकेटेड सर्व्हिसचा प्रशासक बनवले आहे. राज शाह हे व्हाइट हाऊसचे संवाद संचालक आहेत तर अजित पै फेडरल कम्युनिकेशन कमिशनचे चेअरमन आहेत.


अमेरिकेत भारतीय वंशाचे १४ लाख मतदार, २०१६ च्या निवडणुकीत ८४ टक्के भारतीय ट्रम्प यांच्याविरोधात...