उष्ण वातावरणामुळे भारतीयांची रोग प्रतिकारक क्षमता चांगली, ते या महामारीशी चांगला सामना करू शकतील- डब्ल्यूएचओ

नवी दिल्ली/न्यूयॉर्क. जागतिक आरोग्य संघटना(डब्ल्यूएचओ) ने कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी भारत करत असलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोव्हिड-19 साठी डब्ल्यूएचओचे विशेष प्रतिनिधि डॉ. डेविड नवारोने देशात लागू असलेल्या लॉकडाउनचे समर्थन केले. ते म्हणाले की, जिथे यूरोप आणि अमेरिकेसारख्या विकसित देशांनी कोरोनाला गांभीर्याने घेतले नाही, तिथे भारतात यावर वेगाने काम होत आहे.


डॉ. नवारो पुढे म्हणाले की, भारतातील गरम वातावरण आणि मलेरियामुळे भारतातील नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. आम्ही आशा करतो की, त्यांचे शरीर कोरोनाला हरवेल. डॉ. नवारो यांनी यावेळी मलेरिया प्रोन एरिया आणि बीसीजीच्या लसीमुळे कोरोनाला हरवता येऊ शकते, यावरील प्रश्नांचे विस्ताराने उत्तर दिले. त्यांनी यावेळी कोरोनाशी सामना करण्यासाठी मोदी सरकारने उचललेल्या पाउलांचे कौतुक केले. लॉकडाउनमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल ते म्हणाले की, जितका जास्त त्रास होईल, तितक्याच लवकर या समस्येचा उपाय मिळेल.


प्रश्न: जगातील इतरांच्या तुलनेत कोरोनाबाबत भारताला तुम्ही कुठे पाहता ?


उत्तर: आजाराला गांभीर्याने घेण्यासाठी भारताला धन्यवाद. भारताकडे या आजाराचा सामना करण्यासाची क्षमता आहे. तुमच्या देशाने चांगल्या उपाययोजना केल्या. लोकांना संक्रमण आणि आजाराची संपूर्ण माहिती दिली.सर्व जग सध्या मोठ्या आजाराचा सामना करत आहे. हा गुपचूप हल्ला करणारा शत्रु आहे. मला आनंद आहे की, भारताने लवकरच अॅक्शन घेतली. सरकारच्या मशीनरीने मिळून केले. पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी मदत केली.


दुसऱ्या देशांनी यावर वेगाने उपाय केले नाही. त्यांनी मान्य केले की, काही रुग्ण आढळल्यानंतर या आजाराला गांभीर्याने घ्यायला हवे होते. आता तुम्ही अमेरिकेत काय झाले, हे पाहत आहात. जर हीच परिस्थिती भारतात आली असती, तर खूप मोठे संकट आले असते. मला भारतीयांना सांगायचे आहे की, आपल्याला याचा मिळून सामना करायचा आहे. आपण अशा कोणत्याच शत्रुचा यापूर्वी कधी सामना केला नाही. आपण सर्वजण मोठ्या संकटात आहोत. आज मला या रोगाची लागण झाली नाही. पण, उद्या होऊ शकते. मला माझ्या कुटुंबियांचा आणि कम्युनिटीचा जीव वाचवायचा आहे.


प्रश्न: इटली आणि अमेरिकेत भारतापेक्षा चांगल्या आरोग्य सुविधा आहेत, पण तिथे परिस्थिती खूप खराब आहे.


उत्तर: इटली आणि अमेरिकेत कोव्हिड-19 चा गंभीर परिणाम झाला आहे, कारण तिथे कम्युनिटी स्प्रेड झाला आहे. त्या देशांनी लक्षणे आढळल्यावरही लोकांना आयसोलेट केले नाही. जर तुम्ही वेगाने काही पाउले उचलली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. वेगाने उपाययोजना करुनच यावर आळा घातला येऊ शकतो. भारताने ते केल आहे.


प्रश्न: मास्क घातल्याने किती परिणाम होईल?


उत्तर: संक्रमितांनी मास्क घातला पाहिजे, म्हणजे श्वासातून त्यांचे संक्रमण इतरांना होणार नाही. अशा लोकांनी इतरांपासून दोन मीटर अंतरावर राहायला हवं. पण, मास्कसोबतच लोकांना शिंकणे आणि खोकलण्याच्या पद्धती माहिती हव्यात. सर्वात जास्त सुरक्षेची गरज आरोग्य कर्मचाऱ्यांना आहे. ते फ्रंटलाइन वर्कर आहेत. ते थेट रुग्णाच्या संपर्कात येतात. त्यांना सन्मान व्हायला हवा. त्यांच्यासाठी मास्क गरजेचे आहे. पण, मी सर्वांनीच मास्क घालण्याचे समर्थन करतो, यामुळे संक्रमण पसरण्याची भीती कमी होते.


प्रश्न: भारताची लोकसंख्या खूप आहे. अनेकजण लॉकडाउनमध्ये अडकले आहेत. हा लॉकडाउन योग्य उपाय आहे का ?


उत्तर: हा व्हायरस तेव्हाच ट्रांसफर होतो, जेव्हा लोक एकमेकांच्या जवळ येतात. तुमच्या शिंकण्याने किंवा खोकल्याने इतरांना संक्रमण होऊ सकते. यामुळे इतरांपासून लांब राहायला हवे. लॉकडाउनमुले अनेकांना त्रास होऊ शकतो. पण, यामुळे सोशल डिसटंसींग कमी होईल आणि संक्रणाचा धोका कमी होतो.


प्रश्न: भारतात 21 दिवसांचा लॉकडाउन पुरेसा आहे का ?


उत्तर: लॉकडाउनला सुरू ठेवण्याचा निर्णय अनेक गोष्टींवर अवलंबुन आहे. लॉकडाउनला कधी, कुठे आणि कस बंद करायचं, हा निर्णय संक्रमणावर अवलंबुन आहे. लॉकडाउनमध्ये लोकाची भेटण्याची शक्यता फार कमी असते, त्यामुळे अनेक भागात संक्रमण कमी होई शकते. त्यामुळे हा सर्वस्वी संक्रमणावर अवलंबुन आहे.