ब्रुसेल्स. युरोपीय देश बेल्जियममध्ये १५ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. १०११ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे २५०० हून अधिक लोक बरेही झाले आहेत. दरम्यान, तेथील एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. लुबेकजवळील बिनकोम येथे राहणाऱ्या ९० वर्षीय सुझॅन हॉयलर्ट्सला २० मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला श्वसनाचा आजार होता. पण तपासणीत तिला कोरोनचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर तिला आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. तेथे तिची प्रकृती खालावत गेली. दरम्यान, त्यांनी डॉक्टरांना सांगितले, मला आर्टिफिशियल रेस्पिरेशनचा (कृत्रिम श्वसन) वापर करण्याची इच्छा नाही.
माझे सगळे आयुष्य उत्तम प्रकारे जगून झाले आहे. व्हेंटिलेटर तरुण रुग्णांसाठी वापरण्यात यावे. यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे २२ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, जगभरात कोरोनाची साथ गंभीर आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे व्हेंटिलेटर्स अपुरे पडत आहेत.