कोरोनाच्या फैलावासाठी मुस्लिमांना जबाबदार ठरवणे दुर्दैवी गोष्ट - अमेरिका

वॉशिंग्टन. तबलिगी जमात धार्मिक संमेलनाचा प्रकरण समोर आल्यानंतर ट्विटरवर #CoronaJihad, #NizamuddinMarkaz आणि #TablighiJamat यांसारखे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. या हॅशटॅगवर अमेरिकेने आक्षेप नोंदवला आणि म्हटले की, कोरोना व्हायसर मुस्लिम समुदायामुळेच पसरला असे वाटत आहे. असा प्रकार दुर्दैवी आहे.


अमेरिकेचे विशेष राजदूत सॅम्युअल ब्राउनबॅक यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, 'अमेरिकन प्रशासनाने गेल्या काही दिवसांमध्ये अशी बरीच प्रकरणे पाहिली आहेत ज्यात कोरोनाच्या प्रसारासाठी अल्पसंख्याक समुदायांवर आरोप केला जात आहे.'


#CoronaJihad बाबत ब्राउनबॅकने म्हटले की, अशाप्रकारचे हॅशटॅगवरून समजते की, कोरोना व्हायसर मुस्लिम समुदायाच्या लोकांकडून पसरवला जात आहे. अशा प्रकरचा अपप्रचार अनेक भागांतून केला जात आहे. जे की, दुर्दैवी आहे. सरकारने हे थांबवले पाहिजे.


ते म्हणाले की, 'सरकारने याबाबत स्पष्ट केले पाहिजे की, जमातचे लोक कोरोनाचे स्त्रोत नाहीत. आपल्याला माहितच आहे की, या महामारीशी संपूर्ण जग संकटाचा सामना करत आहे. याचा धार्मिक अल्पसंख्यकांशी काही घेणं-देण नाही. मात्र दुर्दैवाने मी अशाप्रकारचे आरोप करताना पाहत आहे. मला आशा आहे की सरकार या विषयाकडे लक्ष देईल आणि लोकांसमोर आपला मुद्दा दृढपणे मांडेल.'


ते म्हणाले की, मुस्लिम समुदायाचे लोक कोरोनाचा फैलाव करत आहेत अशाप्रकारचा विचार एक चिंतेचा विषय आहे. यामुळे देशाला मोठे नुकसान होईल.